Nanded News

Nanded News : नांदेड हादरलं ! खलबत्याने ठेचून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

585 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खलबत्याने ठेचून पोटच्या गोळ्याने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बरबडा गावात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. ही हत्या मृत महिलेच्या मनोरुग्ण मुलानेच केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गोदावरीबाई लिंगोबा वटपलवाड (वय 44 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

काय घडले नेमके?
गोदावरी वटपलवाड या पती आणि दोन मुलांसह बरबडा येथील पेठगल्लीत राहत होत्या. शनिवारी गोदावरीबाई आणि त्यांचा मनोरुग्ण मुलगा श्रीनिवास वटपलवाड हे दोघेच घरी होते. दरम्यान सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास लिंगोबा वटपलवाड हे घरी आल्यानंतर त्यांना गोदावरीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मृतदेहाच्या शेजारीच रक्ताने माखलेला खलबत्ता होता. यानंतर या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर आणि अधिक चौकशी केल्यावर मनोरुग्ण असलेल्या मयत महिलेचा मुलगा श्रीनिवासवर त्यांचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपणचं खून केला असल्याचे कबूल केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंटूर पोलिसांत श्रीनिवास विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!