Nanded News

Nanded News : सुटीवर आलेल्या जवानाकडून गर्भवती पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलीची हत्या

690 0

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून (Nanded News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भारतीय सैन्यदलातील एका जवानाने आपल्या गर्भवती पत्नी आणि मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कुटुंबियांची हत्या केल्यानंतर आरोपी सैनिक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्याने नेमकी कोणत्या कारणातून हत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय आहे प्रकरण?
आरोपी एकनाथ जायभाये याने 23 वर्षीय पत्नी भाग्यश्री आणि 4 वर्षीय मुलगी सरस्वती यांची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी एकनाथ जायभाये स्वतः माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ जायभाये याची पत्नी भाग्यश्री आठ महिन्यांची गर्भवती होती. आरोपी एकनाथ जायभाये हा राजस्थानमधील बिकानेरमध्ये नियुक्त आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एकनाथ जायभाये याने पत्नी भाग्यश्री आणि चार वर्षाची मुलगी सरस्वती या दोघेही झोपेत असताना त्यांची गळा आवळून त्यांची हत्या केली.

हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.आरोपीने माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान हत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या झाल्याने माळाकोळी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!