Nanded Suicide

Nanded Suicide : आई-बाबांनी घेतला एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय; तिन्ही मुलींना बसला मोठा धक्का

778 0

नांदेड : आजकाल लोक छोट्याशा गोष्टीवरून आत्महत्येसारखे (Nanded Suicide) पाऊल उचलत आहेत. मात्र आत्महत्या करणे हे कोणत्या समस्येचे उत्तर होऊ शकत नाही. आत्महत्येने (Nanded Suicide) कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. याऊलट आणखी प्रश्न निर्माण होतात. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

काय घडले नेमके?
नांदेड जिल्ह्यातील वासरणी येथील कैलाश डोंगरे आणि ललिता डोंगरे हे जोडपे आपल्या 3 मुलांसोबत राहत होते. दरम्यान शुक्रवारपासून हे दाम्पत्य बेपत्ता होते. मुलांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना याची माहिती दिली. मात्र दोघांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यांची सगळीकडे शोधाशोध केली असता शनिवारी सकाळी अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील एका शेतात हे दोघेजण आढळून आले.दाभड येथे बावरी नगर बौध्द विहार आहे. या विहारा समोरील एका शेतात दोघे आढळले. यानंतर परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.

या जोडप्याच्या शेजारी दोघांच्या शेजारी कीटकनाशकाची बॉटल आढळून आली. या कीटकनाशकाचे औषध पिऊन आत्महत्या (Nanded Suicide) केली. पत्नी ललिता डोंगरे हीचा जागीच मृत्यू झाला तर पती कैलाश डोंगरे जिवंत असल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दोघांना 3 मुली असून त्यांच्या डोक्यावरून मातृत्वाचे छत्र हरपलं आहे. या दोघांनी इतके टोकाचे पाऊलं का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!