Nanded Accident News

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

645 0

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून (Nanded Accident News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या कंधार येथील सभेसाठी चोंडी तालुक्यातील स्वयंसेवकांची यादी आणि गावातून जमा झालेली देणगी घेऊन कंधारकडे जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बालाजी नारायण जाधव (वय 45 वर्ष, रा. चोंडी, ता. लोहा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
मनोज जरांगे पाटील यांची कंधार येथे 8 डिसेंबर रोजी सभा होत आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातील चोंडी या गावातून मराठा समाज बांधवांकडून जमा झालेली देणगी आणि सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन बालाजी नारायण जाधव हे कंधार येथे जात होते. दरम्यान, कंधार तालुक्यातील बाळंतवाडी या गावाजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा मोठा होता की, मोटारसायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या भीषण अपघातामध्ये बालाजी नारायण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गुलाब लक्ष्मण गीते (वय 27, रा. नागदरवाडी, ता. लोहा) हा युवक जखमी झाला आहे. गुलाब गीते यास कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मराठा स्वयंसेवकात मोठी शोककळा पसरली आहे. नांदेड पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!