नागपूर : समृद्धी महामार्गावर (Nagpur News) अपघातांचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर (Nagpur News) रविवारी आणखी एक अपघात झाला.यामध्ये समोरून जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येत आसलेल्या दुसऱ्या ट्रकने पुढील ट्रकला जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालक सीट आणि स्टेअरिंगमध्ये अडकला. या अपघाताची माहिती हिंगणा पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रकचा पुढील भाग कापून चालकाला बाहेर काढले. नागेंद्र पटेल (27, रा. सिंधी, मध्य प्रदेश) असे अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास समृद्धी महामार्गच्या झिरो पॉइंट शिवमडका या ठिकणी हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
ट्रक क्रमांक (GJ 03 BW 7408) हा लोखंडी रॉड घेऊन अमरावतीहून नागपूरकडे निघाला होता. ट्रक शिवमडका येथे झिरो पॉईंटवर येताच चालक रामलाल सोनी (सतना, मध्य प्रदेश) याने नागपूरकडे जाणारा रस्ता समजत नसल्याने अचानक ब्रेक लावला. दरम्यान, मागून येणार्या (जीजे 03 बीवाय 4894) क्रमांकाच्या ट्रकची जोरदार धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की चालक ट्रकच्या सीट आणि स्टेअरिंगमध्ये अडकला.
या अपघाताची (Nagpur News) माहिती तात्काळ वायफळ मदत केंद्राला देण्यात आली. महामार्ग पोलिस तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने ट्रकचा पुढील भाग कापून चालकाला बाहेर काढले. या अपघातात चालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताप्रकरणी हिंगणा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.