आपला महाराष्ट्रक्राईमव्हिडिओ

Nagpur : नागपूरमध्ये भर रस्त्यात कारने घेतला पेट (Video)

नागपूर : नागपूरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आहे. नागपुरच्या रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवर असलेल्या क्रीम्स हॉस्पिटलसमोर आज सकाळी आज एका कारने पेट घेतला. कारचालकाने तातडीने ही कार कार रस्त्याच्या मधोमध थांबवली आणि जीव वाचवण्यासाठी गाडीतून उतरून अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. यानंतर त्यांनी अथक प्रयत्नांनंतर हि आग विझवली मात्र तोपर्यंत या गाडीचे बरेच नुकसान झाले होते. आयटी पार्कमधील एका खासगी कंपनीत काम करणारे मनीष मरघाटे (वय 35) हे ही कार चालवत होते. ते शुक्रवारी सकाळी मेडिकल चौकातून आपल्या ऑफिससाठी निघाले असताना ही घटना घडली आहे.

गाडीतील वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) ही आग (Fire) लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून ही वाहतूक सुरळीत केली.