Nagpur News

Nagpur News : तिहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं ! एकाच घरात आढळले 3 संशयास्पद मृतदेह

695 0

नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच घरात 3 जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात हे 3 संशयास्पद मृतदेह आढळून आले आहेत. मृतांमध्ये पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा समावेश आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होतं. आज सकाळी बराच वेळ झाला घरातील सदस्य काही बाहेर येत नव्हते. त्यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता सगळेच हादरले. घरात तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीनिवास यांचा मृतदेड बेडरुममध्ये आढळून आला आहे. तर पत्नी पद्मालता आणि मुलगा वेंकटचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळून आला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. या तिघांनी आत्महत्या केली कि त्यांची कोणी हत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी

Pune News : निलेश लंकेंच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन परिसरातील दुचाकीला आग

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!