nagpur crime

Nagpur Crime : जुना वाद मिटवण्यासाठी गेला आणि जीवानिशी मुकला

841 0

नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत (Nagpur Crime) येणाऱ्या डोंगरगाव परिसरात 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शशांक टिंकर असे मृत तरुणाचे नाव आहे तो शिरूड, बुटीबोरी येथील रहिवासी आहे. सौरभ उर्फ बादशाह पंधराम (19) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडात तीन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी आणि मृत दोघेही संताजी कॉलेज, छत्रपती चौक, वर्धा रोड येथे शिकत होते. पैशांवरून त्यांच्यात वाद व्हायचा. दोघेही एकाच तरुणीच्या प्रेमात होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. घटनेच्या दिवशी डोंगरगाव परिसरात वाद मिटवण्यासाठी आरोपींनी मृत तरुणाला बोलावले होते. मृतक आणि त्याचा मित्र मौसम रामटेके हे घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपींनी मृतक आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींमध्ये हाणामारी सुरू झाली.यानंतर आरोपींनी कटरने शशांकवर वार केले. त्याचवेळी दुसरा आरोपी सौरभ यानेही शशांकवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर हिमांशूनेही लाकडी बांबूने त्यावर वार त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शशांकला एम्समध्ये दाखल केले असता रात्री साडेदहा वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या हत्येप्रकरणी वैशाली नगर, बेलतरोडी रहिवासी विशाल सुनील पंचबुद्धे (17, रा. राजाराम नगर), चिंच भवन रा. आकाश वर्मा (16), चिंचभवन रा. शैलेश रामावत (17), हिमांशू आणि बेलतरोडी रहिवासी सौरभ पंधराम (19) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून या सर्व आरोपींना अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!