Raju Dongre

Nagpur Crime : भाजपा पदाधिकाऱ्याची त्याच्याच ढाब्यावर निर्घृणपणे हत्या

616 0

नागपूर : नागपुरातून (Nagpur Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीत निवडूण आलेल्या एका भाजपा पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धाब्यावरील कर्मचाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. धक्कादायक म्हणजे या हत्येनंतर पळून जात असताना आरोपींच्या गाडीचाही अपघात झाला आहे. राजू डेंगरे असे हत्या करण्यात आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री 3 च्या सुमारास एका ढाब्यावर हत्येची घटना घडली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डेंगरे हे विजयी झाले होते. यानंतर आता अज्ञातांकडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजू डेंगरे यांची त्यांच्याच ढाब्यावर हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे यांच्या मालकीचाच धाबा आहे. रात्री तीनच्या सुमारास धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजू डेंगरे यांचा विजय झाला होता. डेंगरे हे भाजपा नागपूर ग्रामीणचे महामंत्री होते. राजू डेंगरे यांच्या हत्येप्रकरणी कुही पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डेंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या हत्येचा तपास करत कारवाई करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!