नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अपघातात (Nagpur Accident) काही जण गंभीर जखमी होतात तर काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक अपघाताची (Nagpur Accident) घटना समोर आली आहे यामध्ये एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि हा अपघात किती भयंकर होता. ही अपघाताची घटना नागपूरमध्ये घडली आहे.
काय घडले नेमके?
नागपूरमधील भरतनगर चौक या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या कार ने मोपेडला धडक देऊन तिला 50 फुटापर्यंत फरफटत नेले. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गाड्या येत जात आहेत. तेवढ्यात एक विद्यार्थीनी स्कूटीवरुन वेगाने जात असते. समोरु एक गाडी स्पीडमध्ये येते आणि विद्यार्थीला स्कूटीसह उडवते. समोरून येणाऱ्या कार ने मोपेड धडक देऊन तिला 50 फुटापर्यंत फरफटत नेले. हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तुम्ही हा अपघात किती भयंकर होता याचा अंदाज लावू शकता.
Nagpur Accident : CA परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत; Video आला समोर pic.twitter.com/RZTeHvu4xU
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 20, 2023
अपघातात (Nagpur Accident) मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचं नाव वैष्णवी धर्मे असे आहे. तिने काही दिवसांपूर्वीच CA ची परिक्षा उत्तीर्ण केली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच वैष्णवीचा दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.