Indoor Crime

धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून भररस्त्यात तरुणीचा छळ (Video)

603 0

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये हिंदू मुलाबरोबर फिरते म्हणून एका तरूणीचा भररस्त्यात छळ करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरून सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडीओमध्ये काही तरूण भर रस्त्यात एका मुलीला दम देताना आणि तिला त्रास देताना दिसत आहेत. हे तीन ते चार तरुण मुलीला त्रास देताना, तिचा फोन हिसकावून घेताना तसेच एवढ्या रात्री हिजाब घालून कुठे फिरते? असे प्रश्न विचारत आहे. यावर तरूणीने मी घरी सांगून मित्राबरोबर बाहेर जेवण्यासाठी गेले होते असे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मदतीसाठी गेलेल्या दोन जणांवर चाकूने हल्ला
इंदौर शहरात रात्री 11 वाजता एका समुहाने दोन वेगळ्या धर्माच्या तरूण-तरूणीला हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले त्यानंतर त्यांचा गाडीवर पाठलाग करत त्यांना घेरले. घटनास्थाळी झालेली गर्दी पाहून दोन नागरिक तरूण- तरूणीच्या मदतीसाठी पुढे आले. मात्र या दरम्यान टोळक्यांपैकी एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले.

याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक
या प्रकरणी पोलिसांनी शोएब लतीफ (23), मुजम्मिल खान (26), दानिश शेख (28), अरबाज शेख (23), शावेज शेख (27) आणि आवेश हनीफ यांना अटक केली आहे तर बाकी फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!