Murder Video

Murder Video : तरुणीने लग्नाला नकार दिल्याने आरोपीकडून तरुणीची हत्या

777 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी एका तरुणीची तिच्याच प्रियकराने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या (Murder Video) केली होती. या घटनेमुळे संपूर्ण दिल्ली हादरली होती. हि घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा गुरुग्राम येथे खळबळजनक घटना (Murder Video) घडली आहे. लग्नास नकार दिल्याने तरुणाने 19 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीच्या आईसमोरच आरोपीने तिची हत्या केली आहे.

Nagpur Crime News : धक्कादायक ! वडिलांच्या वाढदिवशीच लेकाचा दुर्दैवी अंत

काय घडले नेमके?
राजकुमार (23 वर्षे ) असे आरोपीचे नाव आहे. तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी पालम विहार पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मृत्यू झालेली तरुणी आणि आरोपी राजकुमार उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील रहिवाशी आहे. तरुणी घरकाम करत होती. ही संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या या खुनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

राजकुमार आणि 19 वर्षीय तरुणीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. पण, अलीकडेच हे लग्न मोडलं होतं. त्यातच राजकुमार तरुणीला भेटण्यासाठी आला होता. तेव्हा तरुणीची आईही बरोबर होती. यावेळी राजकुमार आणि तरुणीमध्ये वादावादी झाली. याच रागातून राजकुमारने तरुणीवर चाकूने हल्ला (Murder Video) केला. तरुणीच्या आईने राजकुमारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Share This News
error: Content is protected !!