Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकतर्फी प्रेमातून घडलं भीषण हत्याकांड

880 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur News) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रेम करणे वाईट नसते पण एकतर्फी प्रेम करणे खूप भयानक असते. याचा प्रत्यय तुम्हाला या घटनेतून येईल. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सनी अरुण कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सनी हा अट्टल गुन्हेगाऱी प्रवृत्तीचा माणूस आहे. एकतर्फी प्रेमातून हे हत्याकांड झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. आरोपी सनी कांबळेची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील आहे. इथे विटभट्टीवर काम करणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर या मुलीचा मृतदेह त्याने ओढ्यालगतच्या एका झुडपात फेकून दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह ओढ्याकाठच्या झुडपात फेकून देण्यात आला होता. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News
error: Content is protected !!