मुंबई : राज्यात अपघाताची (Mumbai – Pune Highway Accident) मालिका सुरूच आहे. ती काही थांबायचे नाव घेईना. आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai – Pune Highway Accident) कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले आहेत. कंटेनर हा मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाल्याने हा अपघात झाला. सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला.
काय घडले नेमके?
सोमवार सकाळी 9 च्या सुमारास एम एच 46 ए आर 0181 हा कंटेनर पुण्याकडून मुंबईकडे जात होता. पुढे जाताना किलोमीटर 35 जवळ आल्यावर हा कंटेनर (Mumbai – Pune Highway Accident) मुंबईकडील लेन सोडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाला. या अपघातात पाच चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कारमधील 1 महिला आणि चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या मुंबईकडे जाणाऱ्या लेन वरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुणे दिशेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने असून अपघात झालेली वाहने बाजूला काढताना काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आलेली होती. मात्र, आता यावेळी वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.