Chabad-House

Chabad House : ATS ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे सापडला छाबड हाऊसचा फोटो; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

674 0

पुणे : 26/11 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये छाबड हाऊसला (Chabad House) टार्गेट करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे ठिकाण दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी छाबड हाऊस बाहेरील सुरक्षा वाढवली आहे. ATS ने पुण्यातून ज्या दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडे छाबड हाऊसचा (Chabad House) फोटो आढळून आला आहे.

Maharashtra ATS ने केलेल्या कारवाई मध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी करताना त्यांच्याकडे मुंबईतील छाबड हाऊसचे काही फोटो आढळून आले. यानंतर आपली पोलीस यंत्रणा अलर्ट मोड वर आली आहे.

पुणे पोलिसांच्या कारवाईमध्ये या दोघा दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे जिवंत काडतुसांसह ड्रोन बनवण्याचे साहित्य देखील आढळले आहे. NIA च्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये असलेल्या या दहशतवाद्यांच्या ताबा आता महाराष्ट्र एटीस कडे आहे. जयपूर येथे स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्याचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!