Suicide

धक्कादायक! केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य

3494 0

मुंबई : केईएम रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये केईएममधील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी शिवडी येथील टीबी रुग्णालयात आत्महत्या केली आहे. निवासी डॉक्टरने रुग्णालयातच आत्महत्या केल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काय घडले नेमके?
मुळचा जळगावचा आदिनाथ पाटील (27) हा केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. तो मेडिसिन विभागात पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याने टीबी रुग्णालयात रात्रीच्या वेळेस इंजेक्शन घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मात्र त्याने असं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या शोध पोलिसांकडून करण्यात येत आहेत. शिवडी रुग्णालयात सोयीसुविधा अभाव असल्याने अनेक निवासी डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डॉक्टर नैराश्यात जाऊन असे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Share This News
error: Content is protected !!