crime news

Mumbai Crime: आधी हात व पाय बांधले आणि मग तोंडात रुमाल कोंबून…. केअर टेकरचे मालकासोबत धक्कादायक कृत्य

5299 0

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 85 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची त्याच्याच घरी केअर टेकरचे काम करणाऱ्या व्यक्तीने हत्या (Murder) केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुरलीधर पुरुषोत्तम नाईक (Muralidhar Purushottam Naik) 85 वर्ष हे त्यांच्या पत्नी उमा नाईक यांच्यासोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. पती-पत्नी दोघेही व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते मुंबईच्या विलेपार्ले, चेंबूर आणि नवी मुंबई भागामध्ये राहतात. हे जोडपे एकटेच त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळे या काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर आणि एक गृहिणी नेमण्यात आली होती. घरातील मोलकरीण स्वयंपाक आणि साफसफाई करून निघून जायची तर केअरटेकर हा दिवस व रात्रं त्यांच्याबरोबर राहत होता. केअरटेकर मुरलीधर नाईक यांच्यासोबत बेडरूममध्ये झोपायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कामवाली बाई स्वयंपाकासाठी आली तेव्हा तिने बेडरूमचा दरवाजा उघडून पहिले असता मुरलीधर हे मृत अवस्थेमध्ये आढळून आले. यानंतर त्यांनी शेजारच्यांना कळवले. मग त्यांनी विलेपार्ले येथे राहत असलेल्या मुरलीधर नाईक यांच्या मुलाला याची माहिती दिली. यानंतर मुरलीधर यांच्या मुलाने पोलिसांना दिली. यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भादवि कलम प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.

कृष्णा मनबहादूर पेरियार (Krishna Manbahadur Periyar) (वय 30 वर्ष) असे या आरोपी केअर टेकरचे नाव आहे. आरोपी केअर टेकर कृष्णा याची 1 मे म्हणजे आठ दिवस अगोदर नियुक्ती करण्यात आली होती. हि हत्या केल्यानंतर आरोपी कृष्णा हा फरार झाला होता. त्यांने सोन्याची चेन व रुद्राक्ष माला चोरी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी कृष्णाला शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही मदत घेत आहेत. सांताक्रुझ पोलीस या प्रकरणाचा सगळ्या बाजूने तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!