Mumbai Crime News

Mumbai Crime News: मुंबई हादरली! 20 वर्षीय तरुणीकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार

842 0

मुंबई : मुंबईच्या (Mumbai Crime News) चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर एका तरुणीने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
15 वर्षीय पीडित मुलगा आणि 20 वर्षीय आरोपी तरुणी एकाच परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर या तरुणीने त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचारदेतील केले. दरम्यान, महिनाभरापूर्वी मुलगा आणि तरुणी दोघेही गायब झाले होते. याबाबत मुलाच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून या दोघांचा शोध सुरु केला.

पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन चेक केले असता, ते चेन्नईमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांचं एक पथक चेन्नईला रवाना झालं. तेथून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!