घाटकोपर : मुंबईतील घाटकोपरमधून अपघाताची (Mumbai Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवर असलेल्या दुचाकीस्वारानं एका महिलेला उडवलं आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या हातात एक सहा महिन्यांचं बाळ देखील होतं. दुचाकीनं महिलेला उडवलं त्यानंतर दुचाकीवर असलेले दोघे जण घटनास्थळावरून पसार झाले. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातामध्ये बाळ आणि आई जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
ही घटना मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारायण नगर होमगार्ड परिसरात घडली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आपल्या लहान बाळासह रस्ता ओलांडताना दिसत आहे. यादरम्यान पाठीमागून भरधाव दुचाकी आली, या दुचाकीवर दोन तरुण होते, त्यांनी या महिलेला उडवलं. ही महिला आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह जमिनीवर कोसळली. त्यानंतर अपघातस्थळी न थांबता या दुचाकीस्वारांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक या महिलेच्या मदतीला धावले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग
Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग
Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी
Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती
Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु
IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी
Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक