Crime Video

Crime Video : अल्पवयीन मुलीचे घरातून अपहरण करून आरोपींचा ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न

724 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन (Crime Video) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये (Crime Video) सहा पुरुषांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. या पीडित तरुणीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या भयावह व्हिडीओमध्ये चार पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. तर पीडित तरुणी स्वत:चा बचाव करण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी झटत आहेत. पीडितेनं आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला. यानंतर पीडित मुलीने आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना आरोपींमधील एकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

https://twitter.com/jaunpurpolice/status/1691749401751073199

मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक मदतीला धावून येतील या भीतीने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींच्या विरोधात रसूलाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून सर्व आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Share This News
error: Content is protected !!