Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! प्रेम करताना जात धर्म बघू नका असे स्टेटस ठेवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

14503 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) शिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर हादरलं आहे. दोघांच्या घरातून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपवलं. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून त्या ठिकाणी दोघांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

काय आहे नेमके प्रकरण?
ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका. प्रेम करताना जात धर्म बघू नका, अशा प्रकारचा स्टेटस ठेवत कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या केलेला तरुण हा मुस्लिम तर युवती ही हिंदू समाजातील आहे. आत्महत्या केलेला तरुण 18 वर्षांचा तर युवतीचं वय 16 वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

हे दोघेही अल्पवयीन एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेम संबंधात घरच्यांकडून विरोध होता.अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र दोघेही ऐकायला तयार नव्हते. या घरचे ऐकत नाहीत याच भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!