छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शाळेच्या मधल्या सुटीत मैदानावर चार वर्ग मित्रांनी केलेल्या मारहाणीत (Chhatrapati Sambhajinagar) एका 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कार्तिक मनोहर गायकवाड असे मारहाणीत मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.
Crime Video : ताजमहाल बघायला गेलेल्या पर्यटकाला मारहाण; Video आला समोर
काय घडले नेमके?
कार्तिक गायकवाड हा दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. यावेळी वर्गात बसण्यावरून त्याचा एका वर्ग मित्राशी वाद झाला. त्यानंतर मधल्या सुटीत शाळेच्या मैदानावर कार्तिक खेळत असताना त्याचा ज्या विद्यार्थ्यांबरोबर वाद झाला होता त्याने आणि त्याच्या मित्रांनी कार्तिकला एकटं गाठून बेदम मारहाण केली.
Fight Video : शेतरस्त्यावरुन दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी; Video आला समोर
त्या दिवशी कार्तिकच्या पोटात मोठ्या प्रमाणात दुखू लागले. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी (Chhatrapati Sambhajinagar) कार्तिकच्या वडिलांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौलताबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आपला तरुण मुलगा गमावल्याने कार्तिकच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.