Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

692 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील (Pimpri Chinchwad News) चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग (Pimpri Chinchwad News) लागली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात केली.

चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-10) भावेश चौधरी (वय-15) असे या आगीत मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. संबंधित सर्वांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब हार्डवेअर दुकानात चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही आग नेमकी कशी लागली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली पण शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!