Fire

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग

313 0

पुणे : पुण्यातील (Pune) भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये (Tmbar Market) आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये रामोशी गेटजवळ असलेल्या लाकडाच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली. आज सकाळी पहाटे 4 च्या सुमारास ही आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तब्बल 18 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या आगीमध्ये गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!