पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला
इंदापूर तालुक्यातील पोंधवडीमधील एक विवाहित महिलेला सतत आजारी असल्यानं सासरकडील सासू आणि विवाहित महिलेचा पती तुषार खारतोडे याचा दुसरा विवाह करायचा आहे, म्हणून विवाहित महिलेचा सातत्याने छळ चालू होता.. या सगळ्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने स्वतःच्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकारणी भिगवण पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयत विवाहित महिलेचे नातेवाईक जमा झाले होते. सहा तासानंतर सासू, सासरे, पती आणि दीर असे चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.