Maratha Reservation

Maratha Reservation : जालन्याच्या तरूणाने मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

444 0

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या केलेल्या मराठा आंदोलकाचे नाव आहे. सुनिल बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील रहिवासी आहेत. ते संभाजीनगर येथील एका बिल्डरकडे ड्रॅयव्हर म्हणून काम करत होते.

काल सायंकाळच्या वेळेस त्यांनी घरी सांगितलं की मी कामाला चाललो म्हणून निघून गेले. पहाटेच्या वेळेला त्यांनी वांद्रे येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी मराठा आरक्षण एकच मिशन अशी चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यांच्या माघारी पत्नी एक मुलगाआणि एक मुलगी असा परिवार आहे.

सुनील बाबुराव कावळे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ सायन रुग्णालयमध्ये जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Share This News
error: Content is protected !!