Mangalore Accident

Mangalore Accident : भरधाव कारने फुटपाथवर चढून 5 पदचारी महिलांना चिरडलं

587 0

मंगळुरु : देशभरात अपघाताच्या (Mangalore Accident) घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. अनेकदा वाहनचालकाच्या चुकीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक अपघाताची घटना कर्नाटकमधील मंगळुरु या ठिकाणी घडली आहे. या अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये मंगळुरुमध्ये एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं आहे.

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. कर्नाटकातील मंगळुरु येथील लेडी हिल येथे हा अपघात झाला. यानंतर कार न थांबता तिथून लगेच निघून गेली. या घटनेत रूपश्री (23) नावाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर स्वाती (26), हितानवी (16), कार्तिका (16) आणि याथिका (12) या मुली जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सिटीझन मूव्हमेंट ईस्ट बेंगळुरूने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि हा अपघात किती भयंकर होता. या अपघातप्रकरणी पांडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश बलदेव असे या कार चालकाचे नाव आहे.पोलिसांनी कमलेशविरुद्ध कलम 279, 337, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!