मुंबई : रायगडमधील मांडवा येथे (Mandwa Speed Boat Fire) समुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. मांडवा येथील समुद्रकिनाऱ्याला पार्क केलेल्या स्पीड बोटीला लागलेल्या या आगीत दोन खलाशी जखमी झाले आहेत. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समजत आहे. यामध्ये बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काय घडले नेमके?
अलिबाग येथील मांडवा बंदरात समुद्रकिनारी उभ्या करण्यात आलेल्या बेलवेडर या खासगी स्पीड बोटीने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत दोन खलाशी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी आलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एसीसाठी जनरेटरचे कनेक्शन घेत असताना किंवा बॅटरी कनेक्शनमधील झालेला बिघाड दुरुस्त करत असताना बॅटरीचा स्फोट झाला व ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
मांडवा येथील समुद्रात स्पीड बोटीला भीषण आग; दोन खलाशी जखमी pic.twitter.com/waUoacXVha
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 2, 2023
या दुर्घटनेची माहिती मिळताच मांडवा येथील सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सागरी पोलिसांना अथक प्रयत्नानंतर बोटीला लागलेली आग विझविण्यात यश आलं. या आगीत बोटीचा खलाशी दिलदार मारणे व त्याच्या एक साथीदार जखमी झाला आहे. दोघे गंभीररित्या भाजले असून त्यांना मांडवापासून 25 किलोमीटर दूर अलिबागमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर
Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला
Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक
IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी
Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक