Mandap

भाजपच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले

563 0

अमरावती : अमरावतीमध्ये (Amrawati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे. मंडप कोसळल्यानंतर भाजपचे अनेक नेते त्याखाली अडकले होते. यामध्ये भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रविण पोटे हे मंडपाखाली अडकले होते. या सगळ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेतुन आमदार नितेश राणे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी येथे भाजपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडून गेला. या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.

महाजनसंपर्क अभियान अंतर्गत नांदगाव पेठ एमआयडीसी (Nandgaon Peth MIDC) मधील टेक्सटाईल्स पार्कमध्ये शुक्रवारी विकासतीर्थ या औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!