Pune News

Pune News : …तो शो ठरला अखेरचा ! थिएटरमधून बाहेर पडताच 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

848 0

पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Pune News) पूर्ववैमनस्याच्या वादातून 8 ते 10 जणांच्या टोळक्यांकडून एका तरुणाची तलवारी, पालघन, लोखंडी हत्यार आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. पुण्यातल्या मंगला टॉकिजच्या समोर रात्री 12.15 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी 9 जणांवर शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. नितीन मोहन म्हस्के असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश आनंद वानखेडे यांनी या हत्येप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय घडले नेमके?
रात्री सव्वा बाराच्या सुमारास गदर 2 हा सिनेमा पाहून नितीन म्हस्के हे आपल्या घरी जायला निघालेले होते. तेवढ्यात त्यांना मारण्यासाठी लपून बसलेले आरोपी सागर कोळानट्टी आणि त्याच्या साथीदारने म्हस्के याच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केला आणि घटनास्थवरून पळ काढला. ही हत्या जुन्या भांडणाच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या (वय 32), पंडित कांबळे (वय 27), मलिक कोळ्या उर्फ तुंड्या (वय 24), इम्रान शेख (वय 32) आणि त्यांच्या सोबत इतर पाच आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide