MNS Worker

Sinnar Toll Plaza : सिन्नर टोलनाका तोडफोडी प्रकरणी 8 जणांना अटक

743 0

नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्याची (Sinnar Toll Plaza) तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं (Sinnar Toll Plaza) वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे.

MNS Worker : अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड

काय घडले होते नेमके?
अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

अमित ठाकरेंची प्रतिक्रिया
मनसे कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची (Sinnar Toll Plaza) तोडफोड करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषेत बोलले असा दावा अमित ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!