मोठी कारवाई : 6 ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचे छापे ; 55 जणांवर कारवाई

298 0

पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाइन मटक्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे पोलिसांनी एकाच वेळी सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 4 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकूण 55 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार सोमवारी सायंकाळी अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या जवळ मंगला टॉकीज चौक शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रामसर बेकरी कॉर्नरच्या शेजारील स्वस्तिक लॉटरी सेंटर,स्टार लॉटरी सेंटर,सवेरा लॉटरी सेंटर ,साई प्रतीक लॉटरी सेंटर,शहा लॉटरी सेंटर,आणि जीपीएस लॉटरी सेंटर या 6 लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाइन मटका आणि इतर जुगार ,बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे समजले.

त्यानुसार ,बनावट ग्राहक बनून गुन्हे शाखेने 55 आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!