Train Accident In Bangladesh

Train Accident In Bangladesh : बांगलादेशमध्ये ट्रेनचा भीषण अपघात; 20 जण ठार, 100 हून अधिक जखमी

1015 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेशमध्ये (Train Accident In Bangladesh) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन ट्रेनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. राजधानी ढाकापासून 80 किमी दूर भैरब याठिकाणी प्रवासी ट्रेनने एका मालगाडीला धडक दिली. दोन्ही ट्रेन वेगवेगळ्या दिशेने धावत होत्या. धडकेनंतर दोन्ही ट्रेन रुळावरुन खाली घसरल्या. यानंतर त्या ठिकणी मोठी खळबळ माजली.

सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून यादरम्यान खाली दबलेले आणखी मृतदेह सापडू शकतात. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ट्रेन एकाच ट्रॅकवर आल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!