Buldhana News : बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं

985 0

बुलढाणा : बुलढाणा जिल्हाधिकारी (Buldhana News) कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तक्रार मागे घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या व्यक्तीची दोन महिलांनी चपलेने धुलाई केली आहे. हा व्यक्ती स्वत:ला आरटीआय कार्यकर्ता म्हणवत होता. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात हा सगळा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. संतोष चांदमे असं या व्यक्तीचं नाव असून हा व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. ज्या कायद्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. त्याचा वापर हा पैसे उकळण्यासाठी करत होता. अनेक ग्रामपंचायतींवर आरटीआय टाकत पैसे उकळण्याचं काम संतोष करत होता.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव इथल्या महिला उपसरपंच आणि महिला सदस्य यांनाही खोटी तक्रार दाखल करत या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत खंडणी मागितली. यामुळे या घटनांना जरब बसावा यासाठी महिला उपसरपंच मंगला निकम आणि महिला सदस्य अनिता काळे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या व्यक्तीला जाब विचारला.

सुरुवातीला त्याने उडवाउडवी करत या महिलांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पण या महिलांनी रौद्ररुप धारण केलं. अश्लील शिवीगाळ आणि एक लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणेला त्यांनी चपलेने चांगलेच धुतलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. संतोष चांदणे याने भालेगाव सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरणं आपापसात मिटवण्यासठी तो पैसे उकळत होता. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!