accident

मध्यप्रदेशमध्ये पुलावरून बस कोसळून भीषण दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू

408 0

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – आज सकाळी मध्यप्रदेश खरगोन या ठिकाणी आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत. यामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी खरगोनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
आज सकाळी हि बस बोराड नदीच्या पुलावरून कोसळली. नदीत पाणी नसल्यामुळे यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. सध्या 15 जणांचा मृत्यू झाला असून तो आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. या वेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यादरम्यान रुग्णवाहिका न पोहोचल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!