Beed News

Beed News : प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, विश्वासाने संसार पण थाटला मात्र तिने 3 महिन्यात घेतला टोकाचा निर्णय; नेमके घडले काय?

1253 0

बीड : बीडमध्ये एक धक्कादायक घटना (Beed News) घडली आहे. यामध्ये एकमेकांना पाहिलं आणि पाहताक्षणी दोघांचं एकमेकांवर प्रेम देखील जडलं. प्रेमात एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाकादेखील घेतल्या. यानंतर त्यांनी मोठ्या थाटात लग्नदेखील केले. मात्र, लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांनंतर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Beed News) केली आहे. पायल आदेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

Kolhapur Suicide : प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांची कुटुंबासह आत्महत्या

काय घडले नेमके?
आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल चौधरी आणि सांगवी येथील आदेश चौधरी या दोघांचं काही महिन्यांपूर्वी एकमेकांना पाहता क्षणी प्रेम जडलं. त्यानंतर दोघांनीही आयुष्य एकत्र जगण्याच्या आणाभाका घेतल्या. यानंतर त्यांनी पुढे लग्न करून आयुष्यभरासाठी एकत्र गाठ बांधली. यानंतर पायल आणि आदेश यांचा सुखी संसार सुरु झाला. सुरुवातीचे काही महिने अगदी सुखात गेले मात्र यानंतर त्यांच्या या सुखी संसाराला नजर लागली.

पायल आणि आदेश यांच्यात काहीना काही कारणावरून भांडण झाले. सासू आणि नवरा हे दोघेही पायलचा अतोनात छळ करू लागले. अनेक वेळा या छळाने सीमा ओलांडल्या. मात्र, पायल हे सर्वकाही सहन करत राहिली. कारण प्रेम विवाह केल्यामुळे तिला या गोष्टी कोणालाही सांगता येत नव्हत्या. अखेर या सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या (Beed News) केली. ही गोष्ट पायलच्या मामाला कळाल्यानंतर त्यांनी नवरा आदेश आणि सासू अलका चौधरी यांच्याविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. प्रेमविवाह करूनही पायलचा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!