Lonavala Accident

Lonavala Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर धावत्या कंटेनरचा टायर फुटून भीषण अपघात

6939 0

मुंबई : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात (Lonavala Accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कंटेरनचा टायर फुटल्याने अपघातग्रस्त वाहन डिव्हायडर तोडून शेजारच्या लेनमध्ये शिरला आणि हा भीषण अपघात झाला. लोणावळा शहराजवळ हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु या अपघातामुळं मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

कसा घडला अपघात?
मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव वेगाने सुटलेल्या एका कंटेनरचं अचानक टायर फुटलं. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यानजीक हा अपघात झाला आहे. टायर फुटल्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावून धडकला. यानंतर तीन ते चार वाहनं एकमेकांना धडकली. या घटनेत कंटेनरसह अन्य काही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ इजा झाली असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अपघातग्रस्त वाहन मार्गावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!