Car Accident

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

1250 0

लातूर : लातूरमधून (Latur News) अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये लातूरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा प्रसाद निटुरे यांचा औसा तालुक्यातील आशिव या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज लावू शकता.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडीओमध्ये दिसतंय की महामार्गावर एक वाहन बंद पडल्याचं दिसत आहे. ते पाहून ट्रक चालक दूरवरुन गाडीचा वेग कमी करुन आपली लेन बदलतो.या ट्रकच्या मागून एक भरधाव कार येते आणि ती वाहनावर आदळते. या कारचा स्पीडही जास्त असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरची पाहणी केली आणि त्यानंतर चालक प्रसाद निटुरे यांना मृत घोषित केले.

मृत प्रसाद निटुरे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचे सुपुत्र आहेत. या दुर्घटनेनंतर निटुरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!