Latur Accident

Latur Accident : लातूरमध्ये ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; 3 शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू

858 0

लातूर : राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. तुळजापूर औसा महामार्गावर कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा असाच एक भीषण अपघात (Latur Accident) झाला आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये 3 जण शिक्षक होते. या अपघाताची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
लातूरमध्ये तुळजापूर औसा महामार्गावर मध्यरात्री कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू पावलेल्यांपैकी तीन जण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत‌. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. महेबूब मुन्नवरखान पठाण, जयप्रकाश मोतीराम बिराजदार, संजय बाबुराव रणदिवे तर चालक राजेसाब नन्हु बागवान अशी अपघामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

औसा तालुक्यातील शिवलीहून औसाकडे येणाऱ्या भरधाव कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री 12:50 वाजता औसाजवळील साईप्रसाद हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. लातूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sakshi Malik Retirement : ऑलिंपिक पदक विजेत्या साक्षी मालिकची कुस्तीमधून निवृत्ती

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!