Latur News

Latur News : सांगवी-सुनेगाव येथे बस – ट्रकचा भीषण अपघात; 29 जण जखमी

2875 0

लातूर : लातूर-नांदेड (Latur News) राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी-सुनेगाव या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात (Latur News) 29 जण जखमी झाले आहेत. यामधील 12 जण जण गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
अपघातग्रस्त बस (एमए 24 एयू.8160) लातूरहून नांदेडकडे जात होती. तर अपघातग्रस्त ट्रक (एमएच.26 बीई-4576) नांदेडहून लातूरकडे येत होता.यादरम्यान अहमदपूर तालुक्यातील सांगवी-सुनेगाव येथे मेनवल पुलाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत बसमधील 29 प्रवाशी जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून प्रवाशांना ग्रामीण रूग्णालय अहमदपूर येथे दाखल केले. त्यानंतर काही गंभीर जखमींना जिल्हा रूग्णालय लातूर येथे हलविण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!