Kolhapur News

Kolhapur News : घाम गाळून राहतं घर केलं उभं; अन् त्याच घराने केला घात; कोल्हापूर हळहळलं

16170 0

कोल्हापूर : राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) याच पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. आजरा तालुक्यातील किणे गावात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामध्ये एका महिलेचा राहत्या घरानेच जीव घेतला आहे.

VIDEO: दारुच्या नशेत लोकांच्या अंगावर गाडी घातलेल्या तरुणाला पोलिसांनी घटनास्थळी नेत धु-धू धुतलं

काय घडले नेमके?
किणे (Kolhapur News) परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून सौ. सुनीता अर्जुन गुडूळकर या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत वत्सला परसु गुडुळकर देखील जखमी झाल्या आहेत.

ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहत होते. सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पै पै जमा करुन जे घर उभं केलं, भिंती सजवल्या त्याच घराने सुनीता यांचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गुडूळकर कुटुंबार दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!