Kolhapur Crime

Kolhapur Crime : दारूला पैसे न दिल्याने पोटच्या गोळ्याने जन्मदात्या आईची केली हत्या; कोल्हापूरमधील घटना

920 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Crime) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वंदूरमध्ये घडली आहे.

काय घडले नेमके?
निलेश वाईंगडे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर सुनिता अशोक वाईंगडे (वय 51) असे मृत माऊलीचे नाव आहे. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या कागल तालुक्यातील वंदूर येथील सुनिता अशोक वाईंगडे यांच्याशी मुलगा निलेश वाईंगडे याची दारूच्या पैशावरून वारंवार भांडण होत होती. शेजाऱ्यांनी अनेकवेळा मायलेकरांचा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बुधवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या निलेशने आईसोबत दारूला पैसे देत नाही म्हणून वाद घातला. यानंतर हा वाद एवढा वाढला निलेशने आई सुनीता यांच्यावर खुरप्याने वार केले, तसेच नायलॉनच्या दोरीने गळा तिची हत्या केली.

आज सकाळी शेजारच्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने कागल पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!