Kolhapur News

Kolhapur News : दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत महिला आणि पुरुषांमध्ये जोरदार हाणामारी

473 0

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायने दारुबंदीचा ठराव करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. या (Kolhapur News) सभेत दारु बंदीच्या ठरावावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले.या ग्रामसभेदरम्यान अचानक दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

काय घडले नेमके?
ग्रामसभेत माजी महिला जिल्हा परिषद सदस्या भूमिका मांडत असताना इतर महिलांनी त्याला विरोध केला. या गोंधळात सभेचं प्रोसिडिंगही फाडण्यात आलं. त्यामुळे दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीतून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.

सुरुवातीला त्या ठिकाणी महिलांमध्ये जुंपली होती यादरम्यान पुरुषांनी यामध्ये सहभाग घेतल्याने प्रकरण अजूनच तापले. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर गावचे संरपच हेरवडे यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, यानंतरही वाद अधिकच वाढला. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी हा वाद मिटवला. यानंतर पुरुषांना सभेपासून बाजूला हाकलून लावत पुन्हा सभेला सुरवात करण्यात आली. अखेर गोंधळातच दारुबंदीचा ठराव कायम करण्याचा निर्णय बहुमताने करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!