कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापुरातील दसरा चौक येथे शाळेय सहलीच्या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. बसमधील मुलांनी जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा दिल्याने जमावाकडून दगडफेक करण्यात आली. बससह एका चारचाकी वाहनावर ही दगडफेक करण्यात आली. दगडफेक केल्यानंतर जमाव घटनास्थवरून फरार झाला आहे.
मुस्लिम बोर्डिंग समोर हा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुस्लिम बोर्डिंगसमोर बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्याने बसवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली असल्याचे समजत आहे.
शालेय बसवर दगडफेक करणारे कोण होते तसंच, मुस्लिम बोर्डिंगजवळ जाताच जय श्रीरामच्या घोषणा देणारे कोण होते याचादेखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचा तपास सुरू आहे.या दगडफेकीत दोन- चार चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vision Pune : जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने व्हिजन पुणे या शिखर परिषदेचे आयोजन
IMPS Money Transfer : 1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमात होणार बदल
ST Accident : एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात
Pune Crime : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनी मैत्रिणीवरच केले अत्याचार