Kolhapur News

Kolhapur News : खाणीत बुडणाऱ्या पोटच्या गोळ्याला वाचवताना आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू

520 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पैकी मुकनावर वसाहतीजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रशरच्या खाणीतील पाण्यात बुडणाऱ्‍या मुलाला वाचवताना आईचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय 32 वर्षे) आणि मल्लिकार्जुन (वय 10 वर्ष) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत चिमुकली भाची सुद्धा होती. दोघेही पाण्यातून बाहेर न आल्याने तिने पळत घरी जाऊन हा प्रकार सांगितला. यानंतर लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुजाता यांच्या माघारी आई, वडील, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

काय घडले नेमके?
भडगावपासून तीन किलोमीटर अंतरावर चिंचेवाडी रोडलगत मुकनावर वसाहतीच्या शेजारी क्रशर खाण आहे. त्याठिकाणी सुजाता कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी भाची अनुष्काही सोबत होती. मुलगा मल्लिकार्जुन सायकलने आईजवळ खाणीत आला. पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला. जवळच आंघोळ करत असल्याने सुजाताही कपडे धूत होत्या. यावेळी अचानक पाय घसरल्याने मल्लिकार्जुन खोल खड्ड्यात बुडू लागला. हि गोष्ट लक्षात येताच सुजता यांनी पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मल्लिकार्जुनने सुजाता यांना मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

यावेळी सुजाता यांची भाची काठावर होती. बराच वेळ दोघेही पाण्यात दिसून न आल्याने तिने तातडीने घराकडे धाव घेतली. तिने आजोबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर आजोबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कपडे पाण्याशेजारील दगडावर तसेच होते. मल्लिकार्जुनची सायकलही होती. यामुळे काठीने शोध घेण्यात आल्यानंतर काठीला गाऊन अडकल्याने मृतदेह पाण्यावर आले. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!