Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! घरी कोणी नसल्याची संधी साधत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

898 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) मी जीवनात अयशस्वी झाल्याने मी आत्महत्या करत आहे अशा पद्धतीची चार पानी सुसाईड नोट लिहून लोखंडी हुकला दोरी बांधून कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली आहे. मंथन शरद बेंडकळे (वय 22) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कोपार्डे येथे राहणारा मंथन बेंडकळे हा बी.टेक चं शिक्षण घेऊन पदवीधर झाला होता. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता.पण, मुलाखतीमध्ये येतअसलेल्या अपयशाने तो नैराश्यामध्ये जात होता. काल रविवारी दुपारी त्याला कंपनीच्या नोकरीसाठी कॉल आल्याने ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी तो घरी एकटाच होता.आईवडील ढेबेवाडी येथे गावी गेले होते. तर भाऊ सागर मंडळाच्या मंडप उभारणीसाठी कुंभी कारखान्यावर गेला. यावेळी मंथनचे आईवडील त्याला चार वाजल्यापासून फोन करत होते पण तो उचलत नव्हता. मात्र परिक्षेत व्यस्त असेल म्हणून आई वडिलांनी दुर्लक्ष केले.

यानंतर रात्री 10 वाजता भाऊ सागर घरी आला यावेळी वरच्या मजल्यावर मंथनने लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे त्याने पाहिले. त्याने नातेवाईक व मित्रांना आणि पोलीसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर सी.पी.आर रुग्णालयात पाठवला.

सुसाईड नोट आली समोर
आत्महत्येपूर्वी मंथनने सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका. गैरसमज नको मी जीवनात अपयशी झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली आहे. यापूर्वी मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असेही चिठ्ठीत लिहले होते. या घटनेमुळे त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!