Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापूर रस्त्यावर अपघाताचा थरार; शासकीय गाडीची 10 बाईक, 2 कारना धडक

2736 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका शासकीय गाडीने महावीर कॉलेज परिसरात दहा दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांना उडवलं आहे. या अपघातात दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. MH 10 EA 9495 क्रमांकाच्या गाडीने ही धडक दिली आहे. गाडीच्या नंबर प्लेटच्या वर भारत सरकार असं लिहिण्यात आलं आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, तसंच गाडी कोण चालवत होतं, याबाबत अजून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातात दोन कार आणि 10 दुचाकींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

याआधी 6 ऑक्टोबरला पुण्यात अशाच प्रकारचा अपघात घडला होता. पुण्यामध्ये एका चारचाकी वाहनाने 3-4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली होती. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर 3 ते 4 जण जखमी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!