Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ला

639 0

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या हल्लेखोरांनी त्यांची कार देखील उघडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.या हल्ल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मागील काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी यासाठी बीडमध्ये नवीन घर देखील घेतले आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या बीडमधील घरासमोर लावलेल्या त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोराने मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला आहे. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून, हल्लेखोरांनी गाडीत प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला. यानंतर करुणा शर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या अज्ञात हल्लेखोरां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!