Karnataka Crime News

Karnataka Crime News : पत्नीच्या ‘त्या’ सवयीला वैतागून पतीने रागाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

17458 0

कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकमधून (Karnataka Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Karnataka Crime News) एका व्यक्तीने त्याच्या पत्नीने सोशल मीडियाचा अतिवापर केल्यामुळे हत्या केली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली यानंतर तिचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला. त्यानंतर आरोपीने पतीने स्वतः पोलीस ठाण्यात आपण पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यामध्ये मृत महिलेच्या सासऱ्याने पतीला साथ दिली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कोप्पुल गावात हा सगळा प्रकार घडला आहे. हत्या झालेल्या महिलेला सोशल मीडियावर रील आणि शॉर्ट्सचे व्हिडिओ अपलोड करण्याची खूप आवड होती. तिचा दिवसभरातील बराच वेळ फोनवर जात होता. पत्नीची ही गोष्ट पतीला अजिबात आवडत नव्हती. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते. 7 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये याच कारणावरुन जोरदार भांडण झाले. मात्र रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह अन्य एकाला अटक केली आहे.

नदीत फेकला मृतदेह
7 ऑगस्ट रोजीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या श्रीनाथने पूजाचा गळा आवळून तिची हत्या केली. पूजाची हत्या केल्यानंतर श्रीनाथने सासरा शेखरला गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांना घटनेची माहिती देण्याऐवजी सासरच्यांनी श्रीनाथला साथ दिली आणि दोघांनी मिळून पूजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. श्रीनाथ आणि शेखर यांनी पूजाचा मृतदेह बाईकवर नेऊन जवळच्या नदीत दगड बांधून फेकून दिला. हत्येनंतर काही दिवस श्रीनाथ निमिशांबा मंदिरात देखील गेला होता. मात्र पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर श्रीनाथला पश्चाताप होऊ लागला. यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा मान्य केला. पोलिसांनी त्यानंतर श्रीनाथला अटक केली असून पूजाच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide