Kandivali Fire

Kandivali Fire : कांदिवलीत बिल्डिंगला भीषण आग; 8 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

371 0

मुंबई : कांदिवलीतील (Kandivali Fire) महावीर नगर इथं पवन धाम वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 8 वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागल्याचे समजत आहे. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

काय घडले नेमके?
कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगर इथं असलेल्या पवन धाम वीणा संतूर या इमारतीत आग लागली. नऊ मजली असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग भ़डकली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही आग आटोक्यात आली असून या भीषण दुर्घटनेत 8 वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!